भुवनेश्वर कुमारला दुखापत, शार्दूल ठाकूरला संधी
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाला तिसऱ्या कसोटीआधी मोठा झटका बसलाय.
नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाला तिसऱ्या कसोटीआधी मोठा झटका बसलाय.
दुसऱ्या कसोटीत दमदार कामगिरी करणारा भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाहीये. दुसऱ्या कसोटीत खेळताना भुवनेश्वरला दुखापत झाली. यामुळे तिसऱ्या कसोटीत त्याच्या जागी शार्दूल ठाकूरला संधी दिली जाणार आहे.
भुवनेश्वर कुमारने दुसऱ्या कसोटी सामन्यात सहा विकेट घेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे भारताने हा सामना 178 धावांनी जिंकत मालिका खिशात घातली.