मोहाली: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचवेळी जखमी झालेला युवराज टी 20 वर्ल्ड कपच्या उरलेल्या मॅचना मुकणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवराज सिंगऐवजी मनिष पांडेला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. 31 तारखेला भारत वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सेमी फायनल खेळणार आहे.


ऑस्ट्रेलियाच्या मॅचवेळी बॅटिंग करताना युवराजच्या पायाच्या स्नायूला दुखापत झाली होती. यानंतर त्याची फिटनेस टेस्ट घेण्यात आली, यामध्ये तो अयशस्वी झाल्यामुळे त्याला आता वर्ल्ड कप खेळता येणार नाही.