नवी दिल्ली :  आयपीएलमध्ये असं काही नाही जे शक्य नाही. टी-२० फॉर्मेटमध्ये प्रत्येक सामन्यात नवीन कारनामा होतो. अशी अद्भूत कामगिरी कोलकता नाइटराइडर्सच्या मनीष पांडेने केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनीष पांडेने मुंबई इंडियन्सविरूद्ध खेळताना ४७ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. पांडेने आपल्या खेळीत ५ चौकार आणि ५ षटकार लगावले. 


मनीषने केकेआरकडून तुफान फटकेबाजी करताना मॅक्लेगनच्या अखेरच्या षटकात २१ धावा कुटल्या. त्यात १८ धावा दोन चेंडूत काढल्या. 



पहिला चेंडू - मनीष पांडेने लगावला षटकार 


दुसरा चेंडू - नो बॉल होता आणि त्यावर चौकार लगावला. 


दुसरा चेंडू (पुन्हा) - त्यावर वाइड बॉल टाकला. 


दुसरा चेंडू ( पुन्हा ) - या चेंडूवर मनीष पांडेने षटकार लगावला.  


त्यामुळे ६,५,१,६ असे एकूण १८ धावा काढल्या. त्यात एक - एक वाइड आणि नो बॉल होता आणि पांडेने २ षटकार आणि एक चौकारसह १६ धावा काढल्या...