व्हिडिओ : स्टोक्सचा चौकार जडेजानं वीजगतीनं रोखला!
आयपीएल १० मध्ये सर्वात महागडा खेळाडून बनलेल्या बेन स्टोक्सनं १०३ नाबाद रन्सच्या खेळीसह `रायजिंग सुपरजायंट पुणे`ला विजय मिळवून दिला.
मुंबई : आयपीएल १० मध्ये सर्वात महागडा खेळाडून बनलेल्या बेन स्टोक्सनं १०३ नाबाद रन्सच्या खेळीसह 'रायजिंग सुपरजायंट पुणे'ला विजय मिळवून दिला.
गुजरात लायन्सनं हा सामना ५ विकेटसनं गमवला. सुरुवातीला ४ विकेट गेल्यानंतर धोनी आणि स्टोक्सनं ७६ रन्सची भागीदार करत मॅचला विजयाकडे खेचून आणलं. परंतु यानंतर स्टोक्सनं 'मिलियन डॉलर' खेळी करत सेन्चुरीसह शेवटच्या ओव्हरपर्यंत खेळत पुण्याला विजय मिळवून दिला.
स्टोक्स या मॅचचा हिरो ठरला मात्र विरोधी टीमच्या रविंद्र जडेजानंही फिल्डींग करताना सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे राहतील अशी खेळी करून दाखवली.
रायजिंग पुणे सुपरजायंटची टीम १४३/५ वर खेळत असताना, बेन स्टोक्स ८८ आणि क्रिस्टियन ९ रनांवर खेळत होते. थम्पी बॉलिंग करत होता. स्टोक्सनं शॉट खेळला आणि बॉल बाऊन्ड्री लाईनच्या जवळ जात होती...
हा चौकार असेल असं सगळ्यांनाच वाटत असताना रविंद्र जडेजा विजेसारखा बाऊंन्ड्रीकडे धडकला... आणि हा चौकार रोखण्यात त्यानं यशही मिळवलं.