नवी दिल्ली :  इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)च्या दहाव्या सीझनमध्ये शनिवारी इंदूरमध्ये ओपनिंग सेरेमनीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीही जोरदार डान्स केला. इंदूरच्या होळकर स्टेडिअमवर पंजाब आणि पुण्यात सामना रंगला.  यात पुण्याकडून महेंद्रसिंग धोनी खेळत होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महेंद्र सिंग धोनीने आपल्या बायोपिक चित्रपट 'महेंद्र सिंह धोनी- द अनटोल्‍ड स्‍टोरी' यातील अभिनेत्री दिशा पटानी हिला लाइव्ह परफॉर्म करताना पाहिले. या चित्रपटात दिशाने धोनीच्या पहिल्या प्रेयसीची भूमिका केली आहे. 



दिशाने आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये आपल्या 'महेंद्र सिंह धोनी- द अनटोल्‍ड स्‍टोरी' मधील गाण्यावर डान्स केला.  या परफॉर्मन्सपूर्वी दिलेल्या मुलाखतीत दिशा म्हटली की असा प्रकारे मोठ्या स्टेजवर डान्स करण्याची संधी मी गमावू शकत नाही. या डान्ससाठी कोणताही कोरिओग्राफन नव्हता. हा डान्स स्वतः दिशाने बसविला होता.