आयपीएलमधील या 10 स्टार्सना संघात स्थान नाही
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीये. संघात विशेष काही बदल करण्यात आलेले नाहीयेत. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांचे पुनरागमन झालेय. मात्र आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलेले नाहीये.
नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीये. संघात विशेष काही बदल करण्यात आलेले नाहीयेत. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांचे पुनरागमन झालेय. मात्र आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलेले नाहीये.
एमएस धोनी, युवराज सिंग यांना स्थान देण्यात आलेय. मात्र इतर सीनियर प्लेयर्सना आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत असतानाही संघात स्थान देण्यात आलेले नाहीयेत.
गौतम गंभीर, सुरेश रैना, ऋषभ पंत, संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, नीतीश राणा, जयदेव उनादकट, युझवेंद्र चहल, राहुल त्रिपाठी, कृणाल पांड्या या दहा स्टार खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलेले नाहीयेत.