नवी दिल्ली :  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली खांद्याच्या दुखापतीमुळे पहिले दोन सामने खेळू शकला नाही. पण ग्राऊंडच्या बाहेर कप्तान टीम प्लेअर्सला घेऊन जीप चालवताना दिसत आहे. याचा एक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली जीप चालवत असून त्याच्यासोबत क्रिस गेल,  मागील सीटवर एबी डिव्हिलियर्स आणि श्रीनाथ अरविंद बसले आहेत. कोहलीने शुक्रवारी आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्रामवर हा मजामस्तीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.  व्हिडिओमध्ये विराट एक ओपन व्हिंटेज जीप चालविताना दिसत आहे. 


विराट कुठे जात नसून हा एका जाहिरातीच्या शुटिंगचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेअर करताना विराटने शूट टाइम असे म्हटले आहे. रॉयल चॅलेंजर्सच्या बॉइजला जीपमधून फिरवत आहे.