मुंबई इंडियन्सला या खेळाडूमुळे फायनलमध्ये प्रवेश, कुंबळेच्या रेकॉर्डची बरोबरी
आयपीएल-१०मध्ये मुंबई इंडियन्सला फायनलचे तिकिट मिळवूण देणाऱ्या कर्ण शर्माने आपल्या नावावर एक रेकॉर्ड केलाय. त्यांने अनिल कुंबळे यांच्या रेकॉर्डची बरोबरी केली.
मुंबई : आयपीएल-१०मध्ये मुंबई इंडियन्सला फायनलचे तिकिट मिळवूण देणाऱ्या कर्ण शर्माने आपल्या नावावर एक रेकॉर्ड केलाय. त्यांने अनिल कुंबळे यांच्या रेकॉर्डची बरोबरी केली.
मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सला सहा विकेटने हरवून चौथ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय. अंतिम सामना हा रायझिंग पुणे सुपरजाएंट टीमबरोबर होणार आहे. पुण्याने पहिल्यांदा प्रेवश मिळवलाय.
चिन्नास्वामी स्टेडिअमवर मुंबईचा कर्णदार रोहित शर्माने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कोलकाता टीम १८.५ षटकात १०७ धावांवर आटोपली. त्यानंतर मुंबई इंडियन्सने १४.३ षटकात ४ विकेटच्या बदल्यात विजय मिळवला.
या विजयात महत्वाची भूमिका कर्ण शर्मा या गोलंदाजाने बजावली. त्यांने ४ षटकात १६ धावा देत ४ विकेट घेतल्या. त्याचे हे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन राहिले. याआधी अनिल कुंबळे यांच्या नावार हा रेकॉर्ड होता. २००९मध्ये आरसीबीकडून खेळाताना डेक्कन चार्जर्सविरोधात कुंबळेने हा विक्रम केला होता. त्याने १६ धावा देत ४ विकेट घेतल्या होत्या.
कर्ण याच्याबरोबर जसप्रीत बुमराहनेही चार विकेट घेतल्या. कर्ण याच्या गोलंदाजीमुळे केकेआरच्या धावा ७ षटकात ३१/५ झाल्या. यात कर्णच्या तीन विकेट होत्या.
कर्ण शर्मा हा फेब्रुवारीमध्ये झालेल्या लिलावात सगळ्यात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला मुंबईने ३.२ कोटी देऊन खरेदी केले आणि संघात स्थान दिले.