मुंबई : क्रिकेट प्रेमींमध्ये आता इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच IPL चा फिव्हर चढू लागला आहे. आयपीएलचा ९ वा सीजन ९ एप्रिलपासून सुरु होत आहे. आज आयपीएलचा उद्धाटन सोहळा होत आहे. या सोहळ्याकडे लक्ष लागलेय. या ९व्या सीजनमधील पहिला सामना हा मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजाईंट्स यांच्यात होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटमधील सर्वात लहान फॉर्मेटमध्ये अनेक खेळाडू जोरदार फटकेबाजी करत रन्स लुटतात. आयपीएलच्या इतिहात ५ असे खेळाडू आहेत त्यांनी फटकेबाजी करीत चांगले रन्स केलेत. या ५ टॉप खेळाडूंमध्ये सर्वात जास्त रन्स बनविणाऱ्यांमध्ये कोलकाता नाईट राईडर्सच्या कप्तान गौतम गंभीर यांच्याही नावाचा समावेश होतो.



गंभीरने आयपीएल इतिहासमध्ये सर्वात जास्त रन्स करणाऱ्यांमध्ये पाचवा क्रमांक लागतो. त्याने आतापर्यंत ११७ सामन्यात ३०च्या सरासरीने ३१३३ रन्स केल्यात. तर चौथ्या क्रमांकावर आहे इंडियाचा स्टार आणि जगातील क्रमांक एकचा खेळाडू विराट कोहली.



विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून १२३ सामने खेळताना ३२ च्या सरासरीने ३१३७ रन्स केल्यात. तर तिसऱ्या क्रमांकावर आहे वेस्टइंडीजच्या वादळी खेळ करणारा ख्रिस गेल.



गेलने ८२ सामन्यात ४६च्या सरासरीने ३१९९ रन्स केल्यात. गेल हा बंगळुरुकडून खेळतो. तर दुसऱ्या क्रमांकावर आहे रोहित शर्मा.



रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. रोहितने आतापर्यंत १२८ सामने खेळले असून ३३च्या सरासरीने ३३८५ रन्स केल्यात. तर आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त रन्स बनविलेत आणि नंबर एकवर आहे तो टीम इंडियाचा सुरेश रैना.



सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. चेन्नई संघावर बंदी असल्याने त्याची टीम आयपीएलमध्ये सहभागी नाही. मात्र, तो नव्याने दाखल झालेल्या गुजरात लॉयन्सची धुरा संभाळत आहे. त्यांने १३२ सामन्यात ३४ च्या सरासरीने ३६९९ रन्स बनविल्यात.