मुंबई : यंदाच्या आयपीएलच्या लिलावामध्ये विकल्या न गेलेल्या इरफान पठाणला अखेर खरेदीदार सापडला आहे. गुजरात लायन्सनं इरफान पठाणला उरलेल्या मोसमासाठी विकत घेतलं आहे. गुजरातचा ऑल राऊंडर ड्वॅन ब्राव्हो दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याच्याऐवजी इरफानला टीममध्ये घेण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या लिलावामध्ये इरफानची बेस प्राईज ५० लाख रुपये ठेवण्यात आली होती. पण कोणत्याच टीमनं इरफानला विकत घेण्यात उत्सुकता दाखवली नाही. मागच्या ९ आयपीएल सिझनमध्ये इरफाननं १०२ मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं ८० विकेट्स घेतल्या आहेत तर ११३७ रन्स केल्या आहेत. मागच्या ९ वर्षांमध्ये इरफान पठाण किंग्ज इलेव्हन पंजाब, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद आणि पुण्याच्या टीमकडून खेळला आहे.