मुंबई : भारतीय मॉडेल आर्शी खान प्रेग्नंट असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी माध्यमांत आल्या आणि एकच खळबळ उडाली. कारण, तिच्या या मुलाचा बाप पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदी असल्याच्या या बातम्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण, आता मात्र आर्शी खानने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड केलाय. त्यात ती सध्या तीन महिन्यांची प्रेग्नंट असल्याचा दावा तिने केलाय. शाहिद आफ्रिदी आपल्या होणाऱ्या मुलाचा बाप असून सहा महिन्यांनी काय ते सत्य बाहेर येईल, असं ती म्हणतेय. सध्या ती कोलकत्यात शाहिदला चीअर करण्यासाठी आली आहे. 


आपण त्याच्यापासून प्रेग्नंट असल्याने शाहिदलाही आनंद झालाय असा दावा तिने केलाय. आपल्या बाळाला भोपाळला आपल्या आईच्या घरीच आपण वाढवणार असल्याचे ती त्यात म्हणालीये. आता शाहिद आफ्रिदी यावर काय प्रतिक्रिया देतो, ते पाहायला हवं. आता हा एक पब्लिसिटी स्टंट तर नाही ना, अशी शंका शाहिदच्या चाहत्यांना आहे.