रतलाम : आंतरराष्ट्रीय शाओलिन वुशू फेस्टिव्हलमध्ये भारताच्या जितेंद्र जयस्वालनं पाकिस्तानला धूळ चारली आहे. शाओलिन वुशू फेस्टिव्हलमध्ये मार्शल आर्ट्सच्या स्पर्धा झाल्या होत्या. चीनमध्ये हा अकरावा आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल रंगला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जितेंद्र जयस्वालनं पाकिस्तानी खेळाडूला हरवून या स्पर्धेचं कांस्य पदक जिंकलं. रतलाममध्ये आल्यावर जितेंद्रचं जंगी स्वागत करण्यात आलं. नागरिकांनी फटाके वाजवून आणि डान्स करून जल्लोष केला. या विजयानंतर काही संस्था जितेंद्रला मदत करण्यासाठी पुढे आल्या आहेत.