मुंबई : इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारताला धक्का बसला आहे. भारताचा ओपनर के.एल. राहुल हा चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या १ जूनपासून इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तानबरोबर ४ जूनला होणार आहे.


ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजवेळी राहुलच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. यानंतर १० एप्रिलरोजी राहुलवर इंग्लंडमध्ये शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध राहुलनं ७ इनिंग्जमध्ये ६ हाफ सेंच्युरीसह ६५.५० च्या सरासरीनं ३९३ रन्स बनवल्या होत्या. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे राहुल आयपीएललाही मुकला आहे. दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या भारतीय संघामध्ये राहुलऐवजी शिखर धवनला संधी दिली जाऊ शकते.


चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संभाव्य संघ


विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, युवराज सिंग, केदार जाधव, धोनी, हार्दिक पांड्या, अश्विन, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, युझुवेंद्र चहाल