चेन्नई : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीतील चौथ्या दिवशीचा दिवस ऐतिहासिक ठरला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या करुणने जबरदस्त 303 धावांची नाबाद खेळी साकारली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करुणच्या या नेत्रदीपक खेळानंतर करुणच्या आई-वडिलांना आनंद गगनात मावत नव्हता. करुणचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. त्याने आतापर्यंत बरेच कष्ट घेतले. या कष्टाचे फळ मिळाले, अशी प्रतिक्रिया यावेळी करुणच्या वडिलांनी दिली. 


तर करुणचे नेत्रदीपक यश पाहून करुणच्या आईलाही खूप आनंद झाला. खूप अभिमान वाटतोय, मला स्वर्गात असल्यासारखे वाटतेय, असे करुणची आई म्हणाली.