चेन्नई : भारताचा युवा फलंदाज करुण नायरच्या रुपात चेन्नईच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध धावांचे चक्रीवादळ पाहायला मिळाले. कारकिर्दीतील तिसऱ्याच कसोटीत त्रिशतक झळकावत या युवा खेळाडूने अनेक विक्रम आपल्या नावे केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईविरुद्धच्या पाचव्या कसोटीतील चौथ्या दिवशी नायरच्या फलंदाजीने इंग्लिश खेळाडूंचा पालापाचोळा झाला. त्याने नाबाद 303 धावांची दमदार खेळी साकारली. यासोबतच सेहवागनंतर त्रिशतक ठोकणारा तो दुसरा भारतीय फलंदाज बनलाय. 


यावेळी त्याला त्रिशतकाचा दबाव होता का असे विचारले असता करुण म्हणाला, जेव्हा मृत्यू जवळून पाहिलाय तर त्रिशतकाचा दबाव काय असणार. यावेळी त्याने केरळमध्ये घटलेल्या दुर्घटनेची आठवण सांगितली. केरळमध्ये एका कार्यक्रमासाठी जात असताना करुण ज्या नावेत बसला होता त्याला अपघात झाला. नाव नदीत उलटली. मात्र तेथील उपस्थित लोकांनी त्याचा जीव वाचवला. 


या दुर्घटनेविषयी बोलताना तो म्हणाला, कसे पोहायचे हे मला माहीत नव्हते. तेथील उपस्थित लोकांनी मला वाचवले. माझे नशीब चांगले की मला काही झाले नाही. त्यामुळे मृत्यू इतका जवळून पाहिल्यावर त्रिशतकाचे ओझे काय असणार. ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट खेळी आहे.