`मॅन ऑफ दी सिरीज` जिंकणाऱ्या केदारला या गोष्टीचे दु:ख
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत केदार जाधवने ९० धावांची तुफान खेळी केली. मात्र त्यानंतरही भारताला पराभवास सामोरे जावे लागले.
कोलकाता : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत केदार जाधवने ९० धावांची तुफान खेळी केली. मात्र त्यानंतरही भारताला पराभवास सामोरे जावे लागले.
इंग्लंडने तिसऱ्या सामन्यात पाच धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. संपूर्ण मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या केदारला मॅन ऑफ दी सिरीजचा किताब देण्यात आला.
याबद्दल बोलताना केदार म्हणाला, मला दु:ख आहे की आम्ही हा सामना जिंकू शकलो नाही. मात्र मी माझ्या कामगिरीबाबत संतुष्ट आहे आणि पुढेही चांगले खेळण्याचा प्रयत्न करेन.
तिसऱ्या सामन्यातील शेवटच्या षटकापर्यंत केदार खेळत होता. भारताला विजयासाठी एका षटकांत १६ धावांची आवश्यकता होती. शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर केदारने षटकार ठोकला. दुसऱ्या चेंडूवर त्याने चौकार ठोकला. तिसरा चेंडूत धावा काढू शकला नाही. त्यावेळी चौथ्या चेंडूवर त्या मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला मात्र तो बाद झाला.