भारताकडून केदार जाधव लगावले सहावे जलद शतक
भारताने रविवारी पुण्यात खेळण्यात आलेल्या पहिल्या वन डे सामन्यात इंग्लडच्या ३५१ धावांचा पाठलाग करताना सामना खिशात घातला. यात कर्णधार विराट कोहली(१२२) आणि केदार जाधव (१२०) यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
पुणे : भारताने रविवारी पुण्यात खेळण्यात आलेल्या पहिल्या वन डे सामन्यात इंग्लडच्या ३५१ धावांचा पाठलाग करताना सामना खिशात घातला. यात कर्णधार विराट कोहली(१२२) आणि केदार जाधव (१२०) यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
केदार जाधव याने ६५ चेंडूत १०० धावा केल्या. भारताकडून सर्वात कमी चेंडूत शतक झळकविणाऱ्यांच्या यादीत केदार जाधवने स्थान मिळविले आहे. या सामन्यात २०० धावांची भागिदारी करणाऱ्या विराट कोहली याने यापूर्वी दोन वेळा जलद शतक ठोकले आहे.
विराटचे दोन जलद शतक
विराटने ऑस्ट्रेलियाविरूद्ध जयपूरमध्ये २०१३ मध्ये केवळ ५२ चेंडूत शतक लगावले होते. तर नागपूरमध्ये त्याने ६१ चेंडूत शतक झळकावले होते.
सहवागचे जलद शतक
माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने ६० चेंडूत शंभर धावा केल्या होत्या. त्याने २००९ मध्ये न्यूझीलंड विरूद्ध खेळताना हा कारनामा केला होता.
अझरचे जलद शतक
भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याने न्यूझीलंड विरूद्ध १९८८ मध्ये बडोद्यात ६२ चेंडूत शतक झळकावले होते.
युवराजचे जलद शतक
युवराज सिंह देखील या यादीत सामील आहे. त्याने २००८ मध्ये राजकोट वन डेमध्ये इंग्लड विरूद्ध ६४ चेंडूत शतक झळकावले होते.
केदार जाधव या यादीत पाचवा खेळाडू आहे.