लंडन : इंग्लंडचा क्रिकेटपटू केव्हिन पीटरसननं यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली आहे. 20 तारखेला होणाऱ्या लिलावामधूनही पीटरसननं त्याचं नाव मागे घेतलं आहे. मागचं वर्ष खूपचं व्यस्त होतं. वर्षभर प्रवासच करत होतो, त्यामुळे आता एप्रिल आणि मेमध्ये प्रवास करण्याची इच्छा नाही, म्हणून आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे, असं ट्विट पीटरसननं केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीटरसननं यंदा ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये 8 मॅचमध्ये 268 रन केल्या होत्या. यामध्ये दोन हाफ सेंच्युरीचा समावेश होता. आयपीएलच्या मागच्या सीझनमध्ये पीटरसन पुण्याकडून खेळला होता, पण चार मॅचनंतर जखमी झाल्यामुळे त्याला उरलेल्या सीझनला मुकावं लागलं होतं. त्यानंतर पीटरसन दक्षीण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमधल्या टी20 लीगमध्ये सहभाग घेतला होता.