मुंबई: रेसलिंगच्या मॅचमध्ये जखमी झालेल्या खलीला शुक्रवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. आपण याचा बदला घेऊ अशी प्रतिक्रिया खलीनं डिस्चार्ज मिळाल्यानंतर दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी रात्री एका इव्हेंटदरम्यान तीन परदेशी पेहलवानांनी खलीवर हल्ला केला, या पेहलवानांनी खलीला फक्त लाथा-बुक्क्यांनीच नाही तर खूर्चीनंही मारलं, यामध्ये खली जबर जखमी झाला. त्यानंतर खलीला हेलिकॉप्टरनं देहरादूनला आणण्यात आलं. खलीला सात टाके पडले, तसंच त्याला आयसीयूमध्येही ठेवण्यात आलं होतं.  


पण आता डिस्चार्ज मिळाल्यामुळे रविवारी होणाऱ्या मॅचमध्ये आपण खेळणार आहोत, असं खली म्हणाला आहे. रक्ताचा बदला रक्त असं म्हणत खलीनं बदला घ्यायची भावनाही बोलून दाखवली आहे. 


हलद्वानीमध्ये माझ्यामुळे माझ्या फॅन्सना लाज वाटली असेल, पण 28 तारखेला देहरादूनमध्ये होणाऱ्या माझ्या मॅचला त्यांनी हजेरी लावून मी बदला कसा घेतो ते पाहावं, असं आवाहन खलीनं केलं आहे.