रांची : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी टेस्ट सुरु असतानाच भारताला मोठा झटका बसलाय. दुखापतीमुळे विराट कोहली रांची टेस्टमध्ये खेळू शकणार नाहीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सामन्यादरम्यान विराट कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे खेळ सुरु असतानाच मैदान सोडावे लागले. रिपोर्टनुसार या दुखापतीमुळे विराटला १० दिवसांची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आलाय.


त्यामुळे या टेस्टमध्ये विराटला खेळू शकेल याची शक्यता फारच कमी आहे. दरम्यान, आज कोहलीने खेळ सुरु असताना मैदान सोडल्याने अजिंक्य रहाणेने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. 


सामन्यातील ऑस्ट्रेलियाच्या ४०व्या षटकादरम्यान रविंद्र जडेजाच्या चेंडूवर हँड्सकोम्बने शॉट मारला. यावेळी बाऊंड्रीजवळ विराट कोहलीने डाईव्ह मारला. त्यावेळी त्याला खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे तातडीने त्याला मैदान सोडावे लागले. 


आता या दुखापतीमुळे त्याला १० दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आल्याचे रिपोर्टमधील म्हणणे आहे. जर १० दिवसापर्यंत कोहली खेळू शकला नाही तर चौथ्या टेस्टमध्येही तो खेळेल की नाही याबाबत शंका आहे.