बंगळुरु: बांग्लादेशविरुद्धच्या मॅचमध्ये भारतानं शेवटच्या बॉलवर रोमहर्षक विजय मिळवला. शेवटच्या ओव्हरपर्यंत ही मॅच कोण जिंकणार हे स्पष्ट होत नव्हतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय क्रिकेटचे फॅन्स जोरजोरात घोषणा देत होते.


विराट कोहली जेव्हा बाऊंडरी लाईनवर उभा होता, तेव्हा स्टेडियममधले प्रेक्षक कोहली कोहली म्हणून घोषणा देत होते. पण कोहली कोहली घोषणा देऊ नका इंडिया इंडिया घोषणा द्या, असा इशारा कोहलीनं या फॅन्सना केला. 


माझ्यापेक्षा देश मोठा आहे, हे सांगणाऱ्या कोहलीचा हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.