पुणे: आयपीएलमध्ये धोनीच्या पुण्याचा सामना कोहलीच्या बंगळूरुविरुद्ध होणार आहे. शुक्रवारी पुण्यामध्ये हा सामना होईल. या सामन्याआधी कोहलीची सामाजिक बांधिलकी पाहायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यामध्ये असलेल्या आभाळमाया या वृद्धाश्रमाला कोहलीनं भेट दिली. या भेटीचा फोटो कोहलीनं शेअर केला आहे. जेव्हा वेळ होईल तेव्हा समाजासाठी खुल्या दिलानं काहीतरी द्या, असं कोहली म्हणाला आहे.