कोलकता: किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या मॅचमध्ये कोलकत्याचा 7 रन्सनं विजय झाला आहे. अत्यंत रोमहर्षक अशा या मॅचमध्ये पंजाबला शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 11 रनची आवश्यकता होती, पण आंद्रे रसेलनं फक्त या ओव्हरमध्ये तीन रन दिल्या आणि कोलकत्याला जिंकवून दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

165 रनचा पाठलाग करायला आलेल्या पंजाबची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ओपनिंगला आलेला स्टोयनिस शून्य रनवर तर वन डाऊन आलेला मनन व्होराही भोपळा न फोडता पॅव्हेलियनमध्ये परतला. कॅप्टन मुरली विजयलाही फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही, तो 6 रनवर आऊट झाला. 


त्यानंतर मात्र ग्लेन मॅक्सवेलनं (68) आणि वृद्धीमान सहानं (24) रन करून पंजाबचा डाव सावरला. तळाला आलेल्या अक्सर पटेलनं 7 बॉलमध्ये 21 रन करून पंजाबच्या विजयाच्या आशा पुन्हा पल्लवीत केल्या. पण त्यांना विजय मात्र मिळवता आला नाही. 20 रन देऊन 4 विकेट घेणारा आंद्रे रसेल मॅन ऑफ द मॅच ठरला. 


याआधी पंजाबनं टॉस जिंकून कोलकत्याला पहिले बॅटिंगला पाठवलं. याही मॅचमध्ये गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पानं कोलकत्याला 101 रनची सुरुवात करून दिली. पण रॉबिन उथप्पा(70) आणि गंभीर(54) रनवर रन आऊट झाले. तर तीन नंबरला आलेला आंद्रे रसेलही रन आऊट झाला. संपूर्ण इनिंगमध्ये आऊट झालेले सगळे बॅट्समन रन आऊट झाल्याचा हा योगायोग या मॅचमध्ये पाहायला मिळाला.