कोलकाता : आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या मुंबई विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात मुंबईने विजय मिळवला. होम ग्राऊंडवर पराभव झाल्याने कोलकाताच्या चाहत्यांमध्ये ही निराशा पसरली असेल. या ४ कारणांमुळे काल कोलकाता नाईट रायडर्स हारली ज्याच्या फायदा मुंबई इंडियन्सला झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

४ कारणांमुळे कोलकात्याचा पराभव :


१. चुकीचं टीम सिलेक्शन : कोलकात्याच्या टीम सिलेक्शन कमिटीने पीचची व्यवस्थित पाहणी केली नाही. कोलकात्याची पीच ही स्पिनर्सला मदत देणारी नव्हती तरी कोलकात्याने ३ स्पिनर्सला टीममध्ये खेळवलं. 


२. गंभीरची स्लो इनिंग : कर्णधार गंभीरने चांगली खेळी केली असली तरी त्याचा फटका टीमला बसला. गंभीरने खूप स्लो खेळला. त्याने ५२ बॉल्समध्ये ६४ रन्स केले. टी-२० फॉरमॅटमध्ये आणि बॅटींग पीचवर कमी बॉल्समध्ये जास्तीत जास्त फास्ट खेळी महत्त्वाची असते. यामुळे टीमचे जवळपास २० रन्स कमी झाले.


३. युसूफ फ्लॉप : मुंबईच्या बॉलर्सला फेस करतांना युसूफने अनेक बॉस मिस केले. युसूफ पठान हा स्पिनर्सच्या विरोधात चांगला खेळतो पण फास्ट बॉलिंग विरोधात त्याची कामगिरी ऐवढी चांगली राहिलेली नाही. त्यामुळे अशा वेळेस त्याने सुर्यकुमारला बॅटींग दिली पाहिजे होती. 


४. गंभीरची कॅप्टनसी : कॅप्टनचं काम हे शांत आणि समजवणे असते पण गंभीर हा खूपच गंभीर होता. बॉलरला एक फोर लागला तरी तो त्यांच्या चेहरा तणावात आल्यासारखा होत होता. त्यामुळे गंभीरची कॅप्टनसी ही पराभवाला कारणीभूत ठरली.