जेतेपद जिंकणाऱ्या मुंबईवर बक्षिसांचा वर्षाव
आयपीएलच्या दहाव्या हंगामातील अंतिम सामन्यात रायजिंग पुणे सुपरजायंटवर थरारक विजय मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सवर बक्षिसांचा वर्षाव केला जातोय.
मुंबई : आयपीएलच्या दहाव्या हंगामातील अंतिम सामन्यात रायजिंग पुणे सुपरजायंटवर थरारक विजय मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सवर बक्षिसांचा वर्षाव केला जातोय.
आयपीएलच्या दहाव्या हंगामात विजय मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सला १५ कोटी रुपयांचे बक्षिस मिळालेय. तर रनरअप ठरलेल्या पुण्याला १० कोटींचे बक्षिस मिळालेय.
सनरायजर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या डेविड वॉर्नरने संपूर्ण सीरिजमध्ये ६४१ धावा केल्या. त्याला १० लाखांचे बक्षीस देण्यात आलेय. तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारला १० लाखांचे बक्षीस देण्यात आलेय.
आयपीएलच्या दहाव्या हंगामात इमर्जिंग प्लेयर म्हणून गुजरात लायन्सकडून खेळणाऱ्या बासिल थम्पीला १० लाखांचे बक्षीस देण्यात आलेय. कोलकाताकडून खेळणाऱ्या सुनील नरिनेला जलद ५० धावा केल्याने १० लाखांचे बक्षीस देण्यात आलेय.
युवराज सिंहला ग्लॅम शॉट्ससाठी १० लाखांचे बक्षीस देण्यात आलेय. हंगामात सर्वाधिक २६ षटकार ठोकणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला १० लाखांचे, पुण्याच्या बेन स्टोक्सला १० लाखांचे, स्टायलिश प्लेयर म्हणून गौतम गंभीरला १० लाखांचे, गुजरात लायन्सच्या सुरेश रैनाला परफेक्ट कॅचसाठी १० लाखांचे, अंतिम सामन्यात मॅन ऑफ दी मॅच ठरलेल्या कृणाल पंड्याला ५ लाखांचे, स्टायलिश प्लेयर म्हणून पुण्याच्या शार्दूल ठाकूरला एक लाखाचे बक्षीस देण्यात आलेय.