चेन्नई : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने दमदार शतक झळकावलेय. कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे चौथे शतक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुलच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने दीडेशहून अधिक धावांची मजल मारलीये. त्याने 171 धावांत ही शतकी खेळी साकारली. 


सऱ्या दिवशी इंग्लंडचा डाव 477 धावांवर आटोपल्यानंतर भारताचे सलामीवीर लोकेश राहुल आणि पार्थिव पटेल यांनी चांगली सुरुवात करत दिवसअखेर बिनबाद 60 धावा केल्या.


तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात या दोघांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली. पार्थिव पटेल 71 धावांवर खेळत असताना इंग्लंडच्या मोईन अलीने त्याला बाद केले.