मुंबई : महेंद्र आणि हिंतेंद्र महाजन या नाशिकमधल्या डॉक्टर बंधूंनी नवा विक्रम रचला आहे. मुंबई-बंगळुरु-चेन्नई-कोलकाता-दिल्ली आणि पुन्हा मुंबई असा तब्बल सहा हजार किलोमीटरचा प्रवास त्यांनी सायकलवरुन पूर्ण केला. हा इतका प्रदिर्घ प्रवास 12 दिवसांत सायकलवरुन पूर्ण करण्याचं उद्दीष्ट त्यांनी ठेवलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र अकरा दिवसांतच हे अंतर पार करुन महाजन बंधू मुंबईत परतलेत. याचाच अर्थ दर दिवशी त्यांनी सरासरी 545 किलोमीटरचं अंतर सायकलवरुन पार केलं. 


18 डिसेंबरला मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया इथून त्यांनी आपल्या सायकल प्रवासाला सुरवात केली होती. त्यांचा विश्वविक्रमी प्रवास 28 डिसेंबरला मुंबईत परतून यशस्वीपणे पूर्ण झाला. नियमांच पालन करा देश घडवा हा संदेश देण्यासाठी त्यांनी ही सायकल मोहीम केली.