...म्हणून महात्मा गांधींचा ३० वर्षे क्रिकेटला विरोध होता
आपल्या देशात क्रिकेटला खेळांचा धर्म मानला जातो. राष्ट्रपिता महात्मा गांधींनाही शाळेत असताना क्रिकेट आवडत असे. मात्र क्रिकेटचे फॅन असूनही ३० वर्षे महात्मा गांधींचा देशातील पेंटेंगुलर क्रिकेट स्पर्धेला विरोध होता.
नवी दिल्ली : आपल्या देशात क्रिकेटला खेळांचा धर्म मानला जातो. राष्ट्रपिता महात्मा गांधींनाही शाळेत असताना क्रिकेट आवडत असे. मात्र क्रिकेटचे फॅन असूनही ३० वर्षे महात्मा गांधींचा देशातील पेंटेंगुलर क्रिकेट स्पर्धेला विरोध होता.
असे होते या स्पर्धेचे स्वरुप
या स्पर्धेत पाच संघांचा समावेश असे. याची सुरुवात १८७७ साली बॉम्बे जिमखान्यावर झाली होती. सुरुवातीला इंग्रज आणि झोरास्ट्रियन क्रिकेट क्लब (पारसी संघ) हे दोन संघ होते. त्यानंतर १९०७मध्ये हिंदू क्रिकेट संघाचा या स्पर्धेत समावेश झाला.
१९९२मध्ये मुस्लिमांच्या मोहम्मद जिमखाना या संघाचा समावेश झाला. मात्र यानंतर ही स्पर्धा खेळात्मक भावनेने नव्हे तर धार्मिक भावनेने खेळली जायची.
पहिले विश्वयुद्ध झाले तेव्हा ही स्पर्धा खेळवण्यात येत असे. या स्पर्धेला ढाका, श्रीलंका, इस्लामाबाद तसेच लाहोरमधूनही क्रिकेटरसिक येत असत.
या स्पर्धेद्वारे धर्माच्या आधारे समाजात फूट पाडून भारतावर राज्य करा हा इंग्रजांचा मनसुबा होता. हा मनसुबा महात्मा गांधींनी ओळखला होता. त्यामुळे त्यांचा या स्पर्धेला विरोध होता. अखेर १९४६ साली ही स्पर्धा बंद झाली.