राजकोट : रायजिंग पुणे सुपरजायंटविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा विजयीपथावर परतण्यास उत्सुक झालीये. आज मुंबईचा सामना गुजरात लायन्सशी होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला हरवल्यानंतर आत्मविश्वास वाढलेला गुजरातचा संघ मुंबईला जोरदार टक्कर देण्याच्या तयारीनिशी मैदानात उतरेल. रोहित शर्माविरुद्ध सुरेश रैना असा हा सामना रंगेल. 


आयपीएलच्या या हंगामात ते दुसऱ्यांदा आमनेसामने असतील. याआधी १६ एप्रिलला झालेल्या सामन्यात मुंबईने वानखेडे स्टेडियमवर गुजरातला हरवले होते. त्यामुळे गुजरातविरुद्ध विजयाची ही पुनरावृत्ती करण्यास मुंबई सज्ज झालीये.


मुंबईचा संघ गोलंदाजी तसेच फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी करताना दिसतोय. त्यामुळे गुजरातला हा सामना जिंकणे तितकेसे सोपे नसणार आहे. 


सामन्याची वेळ : रात्री ८ वाजता.