पाकिस्तान कसोटी क्रिकेट कर्णधार पद सर्फराज अहमदकडे
पाकिस्तानचा टेस्ट कॅप्टन मिसबाह उल हकनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलाय. आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमध्ये तो आपल्याला अखेरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना पाहता येणार आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानचा कसोटी कर्णधार मिसबाह उल हकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.. आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमध्ये तो आपल्याला अखेरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना पाहता येणार आहे. दरम्यान, आता कर्णधार पद हे सर्फराज अहमदकडे सोपविण्यात आले आहे.
दरम्यान, मिसबाह घरेलु क्रिकेटमध्ये तो खेळत राहणार असल्याचं त्यानं स्पष्ट केलय. 2010मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर मिसबाहकडे पाकिस्तान टीमच्या कॅप्टन्सीची धुरा सोपवण्यात आली होती आणि त्यानं पाकिस्तान टीमला टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थानीही पोहचवलं होतं. आपल्या करियरमध्ये आपण अनेक चढ-उतार पाहिले मात्र आपल्या कामगिरीबाबत समाधानी असल्याचं त्यानं सांगितलं.
आपल्या करियरमध्ये पाकिस्ताननं वर्ल्ड कप जिंकावा असं आपलं स्वप्न होतं मात्र ते पूर्ण होऊ न शकल्याची खंत आपल्याला असल्याचंही तो म्हणाला. तर टेस्ट क्रिकेटमध्ये पाकिस्तान टीमला अव्वल स्थानी विराजमान केलं हा आपल्या करियरमधील अविस्मरणीय क्षण असल्याचं त्यानं सांगितलं. आता पाकिस्तान टीमच्या कॅप्टन्सीची धुरा सर्फराज अहमद याच्याकडे सोपवण्यात आली आहे.
सर्फराजवर दबाव आणण्यापेक्षा त्याला पाठिंबा देण्याची गरज आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात पाकिस्तानच्या संघाचे नेतृत्त्व एकाच खेळाडूकडे असावे, असे मलाही वाटते. त्यामुळे सर्फराजला आपण सर्वांनी पाठिंबा द्यायला हवा. तो संघाला खूप चांगली दिशा देऊ शकतो, असे मिसबाह म्हणाला.