मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ हा बाबा झाला आहे. कैफची बायको पूजानं मुलीला जन्म दिला आहे. कैफनं ही आनंदाची बातमी ट्विटरवरून शेअर केली आहे.


ही आनंदाची बातमी दिल्यानंतर कैफवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, अनिल कुंबळे, आर.पी.सिंग, इरफान पठाण या एकेकाळी कैफ बरोबर खेळलेल्या खेळाडूंनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.