धोनीची शानदार फटकेबाजी
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर बिनधाभारताकडून रास्त धोनी पुन्हा अवतरला आणि मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत त्याने ४० चेंडूत ६८ धावा काढत इंग्लंड संघाची अक्षरशः पिसे काढली. रायडूचे शतक आणि धोनीच्या ६८ धावांच्या जोरावर भारताने ४ बाद ३०४ धावा काढल्या.
मुंबई : मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर बिनधाभारताकडून रास्त धोनी पुन्हा अवतरला आणि मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत त्याने ४० चेंडूत ६८ धावा काढत इंग्लंड संघाची अक्षरशः पिसे काढली. रायडूचे शतक आणि धोनीच्या ६८ धावांच्या जोरावर भारताने ४ बाद ३०४ धावा काढल्या.
भारताने प्रथम फलंदाजी करताना भारताची पहिली विकेट मनदिपच्या रुपात २५ धावांवर गेली त्यानंतर रायडू आणि शिखर धवन यांनी शानदार खेळी करत ११० धावांची भागिदारी केली.
भारताकडून सर्वाधिक रायडूने ९७ चेंडूत १०० धावा केल्या. त्यानंतर तो रिटायर हर्ट झाला. त्यानंतर धोनीने ४० चेंडूत ६८ धावा, शिखर धवनने ८४ चेंडूत ६३ धावा आणि युवराज सिंग याने ४८ चेंडूत ५६ धावा केल्या.
इंग्लंडकडून विली आणि बॅल याने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. आता इंग्लंडला विजयासाठी ३०५ धावांची गरज आहे.