नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने एकाएकी वनडे आणि टी-20चे कर्णधारपद सोडण्याबाबतचे अनेक खुलासे होतायत. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार धोनीवर कर्णधारपद सोडण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता अशी माहिती सूत्रांनी दिलीये. त्याने स्वत:च्या इच्छेने कर्णधारपद सोडले नाही. धोनीने 4 जानेवारीला वनडे आणि टी-20च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीने अचानकपणे कर्णधारपदावरुन पायउतार होण्याच्या निर्णयाने सगळ्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसलाय. बोर्डाला पाठवलेल्या मेलमध्ये धोनीने असे म्हटले होते की, मी कर्णधारपदाचा राजीनामा देतोय आणि विराटला मेंटर बनवण्यासाठी तयार आहे. 


बीसीसीआय निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी नागपूरमध्ये झारखंड आणि गुजरात रणजी सामन्यादरम्यान धोनीची भेट घेतली आणि संध्याकाळी धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. 


यानंतर काही वेळातच एमएसके प्रसाद यांनी धोनीच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्याबाबत विधान केले. मी धोनीला सलाम करतो त्याचे टायमिंग योग्य आहे. त्याला माहीत आहे की टेस्टमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर विराट कोहली तयार आहे.