मुंबई : टीम इंडियाचा वन डे आणि टी-२०चा कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता हे पद  विराट कोहलीकडे येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. विराट हा कसोटी क्रिकेटचा कर्णधार आहे. त्यामुळे विराटवर आता नवी जबाबदारी येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीने वन-डे, टी-२०चे कर्णधार सोडले असल्याची माहिती बीसीसीआयने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. धोनी गेल्या नऊ वर्षापासून टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. टीम क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून महेंद्र सिंह धोनी यांने चांगली कामगिरी केली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताला वन डे आणि टी-२०चा वर्ल्ड कप जिंकला आहे. तो चांगला कर्णधार म्हणून छाप सोडली आहे.


महेंद्रसिंग धोनी आयसीसी २००८-२००९ या वर्षातील सर्वोत्कृष्ट वन डे खेळाडू ठरला आहे. इतके नाही तर धोनीला कसोटी व वन डे संघाचे नेतृत्त्व करण्याचा बहुमानही मिळाला. २०११ चा विश्वचषक, २००७ चा ट्वेंटी-२० विश्वचषक आणी २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी या महत्वाच्या स्पर्धांमध्ये धोनीने भारताला विजेतेपद मिळवून दिले होते. कर्णधारपद सोडले तरी धोनी भारताच्या वन डे आणि ट्वेंटी-२० संघातून खेळत राहणार आहे. 


दरम्यान, धोनीने चांगली कामगिरी केली असली तरी त्याने आजून किती दिवस हे पद संभाळावे, हा प्रश्न आहे, अशी टीका माजी कर्णधार सौरभ गांगुली अलिकडेच केली होती. २०१९ मध्ये वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे पुढील चार वर्षे धोनी जबाबदारी संभाळू शकतो का, टेस्ट क्रिकेट यापूर्वीच त्याने सोडले आहे. वनडे आणि टी-२० मध्ये धोनी खेळत आहे. असे सांगत त्याने धोनीने कर्णधार पदाची जबाबदारी आता युवा खेळाडूकडे द्यावी, अशी सूचना केली होती.