हरारे : झिम्बाब्वेविरुद्धच्या अखेरच्या रोमहर्षक सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर विजय मिळवत मालिका २-१ ने जिंकली. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेविरुद्ध १३८ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेला केवळ १३५ धावा करता आल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात भारताने विजय मिळवला असला तरी भारत मोठे नुकसान होण्यापासून बचावला. आम्ही बोलतोय महेंद्रसिंग धोनीबद्दल. सामन्यादरम्यान एक चेंडू स्टंपवर आदळला ज्यामुळे बेल्स उडून सरळ धोनीच्या डोळ्यावर बसली. यामुळे धोनीला दुखापत झाली. 


त्यानंतर धोनीने फेसबुकवर फोटो अपलोड केलाय. यात धोनीचा डोळा लाल झालेला दिसतोय. हा फोटो पोस्ट करताना डोळ्यांवर बेल्स बसल्यावर हे होतं. नशीब की अंधुक दिसत असताना तसेच डोळ्याला त्रास होत असताना मला कीपिंग करावी लागली.