कटक :  इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी चांगली कामगिरी करता आली नाही. जोरदार फटका मारताना तो बाद झाला. हे अपयश धोनीच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे तो आता फटकेबाजीचा जोरदार सराव करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधारपदावरून दूर झाल्यानंतर त्याचा हा पहिलाच सामना होता. त्यामुळे त्याचाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण तीन फलंदाज पटापट बाद झाल्यावर मैदानात आलेल्या धोनीला आपल्या नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. स्वस्तात बाद झाला. 


आता येत्या १९ जानेवारी रोजी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी धोनीने कंबर कसली असून तो जोरदार फटकेबाजी करण्याचा सराव करत आहे. 


पाहा व्हिडिओ