बीसीसीआय निवड समिती अध्यक्षपदी एमएसके प्रसाद
बीसीसीआयच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटर एमएसके प्रसाद यांची निवड झालीय. बीसीसीआयची मुंबईत बैठक झाली. त्यात हा निर्णय झालाय.
मुंबई : बीसीसीआयच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटर एमएसके प्रसाद यांची निवड झालीय. बीसीसीआयची मुंबईत बैठक झाली. त्यात हा निर्णय झालाय.
निवड समिती अध्यक्षपदाच्या शर्यतीत व्यंकटेश प्रसाद, आशीष कपूर, मनिंदर सिंग, गगन खोडा यांची नावं चर्चेत होती.
तसंच सचिवपदी अजय शिर्के यांची बिनविरोध निवड करण्यात आलीय. यापदासाठी एकट्या शिर्केंचा अर्ज आला होता. आज सुरू झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत शिर्केंची यापदावर निवड झालीय.