मुंबई : वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात आज मुंबई इंडियन्सने गुजरात लायन्सला ६ विकेटनी पराभव केला. मुंबईचा हा सलग चौथा विजय आहे. यासोबत मुंबईने पॉईंट टेबलमध्ये ८ गुणांसह अव्वल स्थान मिळवलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईचा नितीश राणा पुन्हा एकदा या सामन्यात चमकला. त्याने अर्धशतकी खेळी साकारली. त्याला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देण्यात आला. 


गुजरात लायन्सची चौथ्या सामन्यांपैकी तिसरा पराभव आहे. गुजरातने पहिल्यांदा फलंदाजी करताना १७६ धावा केल्या होत्या. मुंबईने सहा विकेट राखत हे आव्हान पूर्ण केले.