पुण्यानं मुंबईला पुन्हा हरवलं!
यंदाच्या आयपीएलच्या मोसमामध्ये पुण्यानं मुंबईचा पुन्हा एकदा पराभव केला आहे.
मुंबई : यंदाच्या आयपीएलच्या मोसमामध्ये पुण्यानं मुंबईचा पुन्हा एकदा पराभव केला आहे. २० ओव्हर्समध्ये १६१ रन्सचा पाठलाग करताना मुंबईला १५७ रन्सपर्यंत मजल मारता आल्यामुळे रोहित शर्माच्या टीमचा ३ रन्सनं पराभव झाला.
मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मानं ३९ बॉलमध्ये ५८ आणि पार्थिव पटेलनं २७ बॉल्समध्ये ३३ रन्सची खेळी वगळता दुसऱ्या कोणत्याही मुंबईच्या बॅट्समनला यश आलं नाही. पुण्याच्या जयदेव उनाडकट आणि बेन स्टोक्सनं प्रत्येकी दोन विकेट आणि सुंदर, ख्रिशन्च, ताहिरला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि पुण्याला १६० रन्समध्ये रोखलं. राहुल त्रिपाठीनं सर्वाधिक ४५ रन्स केल्या. कर्ण शर्मा आणि जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी दोन तर हरभजन आणि मिचेल जॉनसननं प्रत्येकी एक विकेट घेतली.