बंगळूरु : अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवत आयपीएलच्या दहाव्या हंगामातील जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने पुण्यावर १ धावेने विजय मिळवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईने प्रथम फलंदाजी करताना पुण्यासमोर १३० धावांचे लक्ष्य ठेवले. अजिंक्य रहाणे(४४) आणि कर्णधार स्टीव्हन स्मिथ(५१) यांच्या शानदार खेळीनंतरही पुण्याला २० षटकांत केवळ १२८ धावा करता आल्या.


मुंबईने जरी या सामन्यात विजय मिळवला असला तरी एक लाजिरवाणा रेकॉर्डही त्यांनी केलाय. मुंबईने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणा रेकॉर्ड आपल्या नावे केलाय.


हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर पुण्याविरुद्ध मुंबईने प्रथम फलंदाजी करताना १२९ धावा केल्या. टी-२० लीगच्या अंतिम सामन्यातील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. 


याआधी ९ अंतिम सामने खेळवण्यात आले होते. २००९मध्ये डेक्कन चार्जसनेही आयपीएलच्या अंतिम सामन्यात बंगळूरुविरुद्ध सर्वात कमी म्हणजेच १४३ इतकी धावसंख्या उभारली होती. मात्र काल मुंबईने सर्वात कमी धावसंख्या उभारण्याचा लाजिरवाणा रेकॉर्ड आपल्या नावे केला.