मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्स यांच्यात आज सामना रंगणार आहे. या मॅचमध्ये गुजरातनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टीने मुंबईसाठी आजचा सामना करो वा मरो असणार आहे. मुंबईचा संघ गुणतालिकेत १३ सामन्यात सात विजयासह पाचव्या स्थानी आहे. 


दुसरीकडे गुजरातचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे त्यांचेही लक्ष्य हा सामना जिंकून प्लेऑफ मध्ये जाण्याचे असेल. मुंबईकडून रोहित शर्मा, अंबाती रायडू, किरेन पोलार्ड आणि क्रुणाल पांड्या यांच्या कामगिरीवर नजर असेल. 


गेल्या सामन्यात क्रुणालच्या ८६ धावांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर मुंबईने दिल्लीवर ८० धावांनी मोठा विजय मिळवला होता. अशाच प्रकारचे प्रदर्शन करण्यावर आज मुंबईचा भर असेल. 


पाहा लाईव्ह स्कोअर