राजकोट : यंदाच्या आयपीएलमधली पहिली सुपर ओव्हर गुजरात लायन्स आणि मुंबईमध्ये पाहायला मिळाली. अत्यंत रोमहर्षक अशा या सामन्यामध्ये मुंबईनं गुजरातला हरवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१५३ रन्सवर ही मॅच टाय झाल्यावर मुंबईला सुपर ओव्हरमध्ये ११ रन्स बनवता आल्या. यानंतर जसप्रीत बुमराहनं सुपर ओव्हरमध्ये फक्त ६ रन्स दिल्या.


१५४ रन्सचा पाठलाग करताना मुंबईचा २० ओव्हर्समध्ये १५३ रन्सवर ऑल आऊट झाला. मुंबईकडून पार्थिव पटेलनं सर्वाधिक ७० रन्स बनवल्या तर हार्दिक पांड्यानं २९ रन्स केल्या. विजय सोपा वाटत असतानाच मुंबईची बॅटिंग गडगडली आणि मॅच टाय झाली. गुजरातकडून थंपीनं ३, फॉकनरनं २ आणि अंकित सोनीनं एक विकेट घेतली.


राजकोटमध्ये झालेल्या या मॅचमध्ये गुजरातनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि २० ओव्हर्समध्ये १५३ रन्स केल्या. इशान किशनला सर्वाधिक ४८ रन्स बनवता आल्या. मुंबईच्या कृणाल पांड्यानं ३, बुमराह आणि मलिंगानं प्रत्येकी २ आणि हरभजनं एक विकेट घेतली.