धर्मशाला: वर्ल्ड टी 20 च्या दुसऱ्या ग्रुपच्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं ऑस्ट्रेलियाचा 8 रननी पराभव केला आहे. रोमहर्षक अशा या मॅचमध्ये सुरवातीला ऑस्ट्रेलिया जिंकेल असं वाटत होतं, पण न्यूझीलंडनं शानदार कमबॅक करत ही मॅच आपल्या खिशात टाकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉस जिंकून न्यूझीलंडनं पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियापुढे 143 रनचं आव्हान ठेवलं. न्यूझीलंडकडून मार्टिन गुप्टिलनं सर्वाधिक 39 रन केल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून जेम्स फॉकनर, ग्लेन मॅक्सवेलनं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.


143 रनचा पाठलाग करायला आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. ओपनिंगला आलेल्या उस्मान ख्वाजानं 27 बॉलमध्ये 38 तर वॉटसननं 12 बॉलमध्ये 13 रन केल्या. पण त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाच्या झटपट विकेट पडल्या. मॅक्सवेल आणि मार्शनं पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा डाव सावरायला सुरुवात केली, पण तेही 22 आणि 24 रनवर आऊट झाले. त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाला सावरता आलं नाही. 


न्यूझीलंडनं हा सामना जिंकल्यानं पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझिलंड पहिल्या क्रमांकावर गेली आहे. तर पाकिस्तान 2 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडच्या या विजयामुळे भारताचा फायदा होण्याची शक्यता आहे. 


ही मॅच ऑस्ट्रेलिया जिंकली असती तर पॉईंट्स टेबलमध्ये 3 टीम्स या 2 पॉईंट्सवर गेल्या असत्या, आणि भारताला जास्त मॅच त्याही मोठ्या फरकानं जिंकाव्या लागल्या असत्या.