मुंबई: यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये 4 पैकी 3 टीमनं आपलं सेमी फायनलमधलं स्थान पक्कं केलं आहे. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या 3 टीम सेमी फायनलमध्ये क्वालिफाय झाल्या आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामध्ये आशिया खंडातल्या एकही टीमचा समावेश नाही.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिया खंडातल्या भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या 4 टीम या वर्ल्ड कपमध्ये होत्या, पण यातल्या 3 टीमना वर्ल्ड कपमधून पॅक अप करावं लागलं आहे. तर भारत मात्र सेमी फायनलमध्ये जायच्या रेसमध्ये अजूनही आहे. 


रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला, तर या टी 20 वर्ल्ड कपमध्ये चारही टीम या आशिया खंडातल्या नसतील. मुख्य म्हणजे हा वर्ल्ड कप भारतामध्ये होत असूनही आशिया खंडामधल्या या टीमना सेमी फायनलही गाठता आलेली नाही. 


आत्तापर्यंत झालेल्या 5 टी 20 वर्ल्ड कपच्या प्रत्येक सेमी फायनलमध्ये आशिया खंडातला संघ होता. त्यामुळे यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये हे रेकॉर्ड अबाधित राहणार का तुटणार हे सगळं रविवारी होणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या मॅचवर अवलंबून असणार आहे.