COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : बंगळुरु कसोटीदरम्यान स्टिव स्मिथ आणि विराट कोहलीमध्ये  डीआरएस सिस्टमवरुन झालेल्या वादानंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचं आयसीसीने स्पष्ट केलं.
 
या वादानंतर विराट आणि स्टीव्ह यांच्याविरोधात किंवा पाठींब्यासाठी अनेक जण बोलू लागले. भारतीय आणि ऑस्ट्रेलिअन बोर्डसुध्दा परस्परांना नाव न घेता बोलू लागले.


याबाबत बोलताना आयसीसीकडून असं स्पष्ट केलं गेलं की, 'आयसीसी या सामन्यादरम्यान झालेल्या आचारसंहीतेच्या उंल्लघनाबाबत कुणावरही आरोप करत नाहीय. स्टीव स्मिथ आणि विराट कोहली यांच्याबाबत चर्चा झाली असून कोणावरही काहीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतला गेलाय.'


 ते पुढे म्हणाले की ,'दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या पुढच्या रांची कसोटीकडे सर्व खेळाडूंनी लक्ष केंद्रित करावं. दोन्ही कर्णधारांनी आपलं लक्ष विचलित होऊ देऊ नये.'