नोवाक जोकोविचला फ्रेंच ओपनचे जेतेपद
सर्बियाचा टेनिसस्टार नोवाक जोकोविचने फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावलंय. फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत त्याने अँडी मरेचा 3-6, 6-1, 6-2, 6-4 असा पराभव करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
पॅरिस : सर्बियाचा टेनिसस्टार नोवाक जोकोविचने फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावलंय. फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत त्याने अँडी मरेचा 3-6, 6-1, 6-2, 6-4 असा पराभव करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
जोकोविचचं हे टेनिस कारकिर्दीतील पहिले फ्रेंच ओपन विजेतेपद आहे. आतापर्यंत त्याने १२ ग्रँडस्लॅम विजेतेपदे मिळवलीत.
या विजयामुळं जोकोविचनं आणखी एक नवा रेकॉर्ड रचलाय. 1969 नंतर पहिल्यांदाच चारही ग्रँड स्लॅम जिंकणारा जोकोविच पहिलाच टेनिसपटू ठरलाय.