नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये तुम्ही अनेक रेकॉर्डबद्दल ऐकले असेल. मात्र एका बॉलमध्ये २८६ रन्स बनवण्याच्या रेकॉर्ड कदाचित तुम्हाला माहित नसेल. एका बॉलमध्ये साधारण किती रन्स बनू शकतात दोन, तीन, चार, सहा मात्र १८९३-९४दरम्यान एका क्रिकेटच्या सामन्यात एका बॉलमध्ये चक्क २८६ रन्स बनले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा रेकॉर्ड १८९३-९४मध्ये इंग्लिश डोमेस्टिक स्पर्धेत व्हिक्टोरिया आणि स्क्रॅट इलेव्हन या दोन संघादरम्यानच्या सामन्यात झाला होता. त्यावेळी एका बॉलमध्ये बॅट्समन कितीही रन्स बनवू शकत होता. आता मात्र एका बॉलमध्ये जास्तीत जास्त तीन रन्स बनवता येतात. 


पाल मला गॅझेट या वर्तमानपत्रात १५ जानेवारी १८९४ रोजी ही बातमी छापून आली होती. झाले असे की या सामन्यात खेळताना बॅट्समनने मारलेला चेंडू मैदानाजवळच्या झाडाच्या फांदीवर जाऊन अडकला. मग काय बॅट्समनने रन्स काढण्यास सुरुवात केली. 


अनेक प्रकारे बॉल मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. सुरुवातीला झाड कापण्यास सांगितले मात्र हा प्रयत्न असफल राहिल्याने रायफलच्या सहाय्याने बॉल काढण्यासाठी प्रयत्न सुरु झाले अखेर मोठ्या प्रयत्नांनी प्रतिस्पर्धी संघाने झाडावरुन बॉल मिळवला मात्र तोपर्यंत बॅटिंग कऱणाऱ्या संघाने २८६ रन्स बनवले होते. 


स्क्रॅच इलेव्हनला व्हिक्टोरियाचे हे आव्हान पूर्ण करता न आल्याने व्हिक्टोरिया संघाचा यात विजय झाला.