मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप त्या दोघांकडून ब्रेकअपबद्दल कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी-२० वर्ल्डकपदरम्यान विराटच्या दमदार कामगिरीवर अनुष्काच्या नावाने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जोक्स फिरत होते. मात्र याप्रकरणी विराटने नाराजी व्यक्त केली होती. 


आता ही जोडी बांद्र्याच्या रॉयल्टी क्लब येथे एकत्र दिसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विराट आणि अनुष्का डिनर डेटवर गेले होते असे सांगण्यात येतेय.


काही दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्काचा ब्रेकअप झाला नसल्याची एका मिडीया रिपोर्टचे म्हणणे होते. त्या रिपोर्टनुसार, त्या दोघांनी काही काळासाठी ब्रेक घेतला होता. विराटला टी-२० वर्ल्डकपवर लक्ष केंद्रित करायचे होते. तर अनुष्का सुल्तान आणि ए दिल है मुश्किल या चित्रपटाच्या चित्रीकरणार व्यस्त होती.