मुंबई : भारताचा वनडे आणि टी-20 कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 12 वर्षांपूर्वी याच दिवशी बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2004मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण कऱण्यापूर्वी धोनीच्या त्यांच्या उंचच उंच सिक्समुळ प्रकाशझोतात आला होता. तो आपल्या विकेटकीपिंगपेक्षाही विस्फोटक फलंदाजी आणि लांब केसांसाठी प्रसिद्ध होता. 


2003-04मध्ये धोनी 'भारत अ' कडून विकेटकीपर तसेच फलंदाज म्हणून झिम्बाब्वे आणि केनिया दौऱ्यावर गेला होता. हा दौरा त्याच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरला. 


केनिया दौऱ्यावर केनिया, भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये धोनीने चांगली कामगिरी केली होती. यात खेळण्यात आलेल्या 6 डावांमध्ये धोनीने दोन शतकांसह एकूण 362 धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळेच त्याला टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली होती. 


जगातील फिनिशर क्रिकेटपटू म्हणून प्रसिद्ध असलेल्या धोनीने पदार्पणाच्या सामन्यात 0 धावा केल्या होत्या. बांगलादेशविरुद्धच्या आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात धोनी सातव्या नंबरवर खेळण्यासाठी उतरला आणि पहिल्या चेंडूत तो बाद झाला. 


मात्र पाचव्या वनडेत त्याने विशाखापट्टणमच्या मैदानावर पाकिस्ताविरुद्धच्या 2004-05मध्ये तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरलेल्या धोनीने कमाल केली आणि 148 धावांची जबरदस्त खेळी केली. या सामन्यात धोनीने एकूण 14 चौकार आणि 4 षटकार मारले. 


वनडे क्रिकेटमध्ये एक वर्ष सातत्याने चांगला खेळ केल्यानंतर 2005मध्ये त्याला कसोटी संघात स्थान देण्यात आले. यानंतर टी-20 क्रिकेट सुरु झाले आणि धोनीला टी-20 संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले.