रियो दी जानेरिओ : रियो ऑलिम्पिकची दिमाखात सुरुवात झाली आहे. ब्राझिलनं या सेरेमनीतून आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवलं. भव्य असा लाईट शो या सेरेमनीचं ख-या अर्थआनं वैशिष्ट्य ठरलं. आर्थिक अडचणीत सापडलेलं ब्पाझिल या ओपनिंगचं सेरेमनीचं भव्य-दिव्य आयोजन करु शकणार का याकडेच अवघ्या क्रीडा जगताचं लक्ष होतं, पण ब्राझिलनं सा-यांनाचं तोंडात बोट घालायला भाग पाडलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2014 फुटबॉल वर्ल्ड कपची फायनल रंगेल्या स्टेडियमवर म्हणजेच माराकान स्टेडियमवर ओपनिंग सेरेमनीचा सोहळा रंगला. 206 देशांतील जवळपास अकरा हजार स्पर्धक यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये मेडल्ससाठी भिडणार आहेत. 


रियो ऑलिम्पिकच्या ओपनिंग सेरेमनीत भारतीय पथकाचं नेतृत्व अभिनव बिंद्रानं केलं. यावेळेस ऑलिम्पिकमध्ये भारताचे सर्वाधिक अॅथलिट्स सहभागी झालेत. एकूण 119 अॅथलिट्सची टीम ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली आहे. भारताकडून यावेळे शूटिंग, टेनिस, बॅडमिंटन आणि कुस्तीमधून मेडल्सच्या अपेक्षा आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे एकूण आठ अॅथलिट्स ऑलिम्पिकमध्ये आपली जादू दाखवणार आहेत. 


पाहा ओपनिंग सेरेमनीचं खास क्षण